कुष्ठधाम येथील वृध्दांना नवीन कपड्यांचे वाटप

केडगाव जागरूक नागरिक मंचचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांना मदतीपेक्षा प्रेम व आपुलकीची गरज असते. दीन-दुबळ्यांना मायेचा आधार मिळाल्यास त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होत असतो. वंचितांच्या जीवनात हास्य व आनंद निर्माण करण्याच्या उद्देशाने केडगाव जागरूक नागरिक मंच कार्य करीत असल्याचे प्रतिपादन मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी केले.
केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीने कुष्ठधाम येथील वृध्दांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पाचारणे बोलत होते. यावेळी डॉ. सुभाष बागले, प्रविण पाटसकर, अक्षय शिंदे, जगन्नाथ कांजवणे, कुष्ठधामचे प्रमुख महेंद्र मुनोत, आश्‍विनी पाचारणे आदींसह पाचारणे व पवार परिवारीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुभाष बागले यांनी केडगाव जागरूक नागरिक मंच आपुलकीने गरजूंना आधार देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. कुष्ठधाममध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे माप घेऊन त्यांच्यसाठी शर्ट, पॅन्ट व पायजमा शिवण्यात आले. तर महिलांना सहा व नऊवारी साड्यांचे वाटप करण्यात आले.