जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनाच आला हा अनुभव
सर्व चारचाकी वाहनांच्या मालकांनो सावधान , वाहतूक पोलीस आपले निव्वळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी चुकीच्या मार्गाने दंड वसुली करीत आहेत. जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनाच हा अनुभव आला आणि त्यांनी या विरोधात आवाज उठविण्याचे ठरविले असून ते यासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा विचार करीत आहेत.
राज्य शासनाला आपली तिजोरी भरायला मार्ग कमी पडू लागले असल्यामुळे आता महामार्ग पोलीस शासनाच्या तिजोरीच्या मदतीला धावले आहेत, शासनाचे टारगेट पूर्ण करायच्या नादामध्ये आता वाहतूक विषयी नियम मोडणारां साठी चे दंड हे दुप्पट, तिप्पट नव्हे तर काही ठिकाणी दसपटीने वाढवलेले आहेत,
राज्य शासनाला आपली तिजोरी भरायला मार्ग कमी पडू लागले असल्यामुळे आता महामार्ग पोलीस शासनाच्या तिजोरीच्या मदतीला धावले आहेत, शासनाचे टारगेट पूर्ण करायच्या नादामध्ये आता वाहतूक विषयी नियम मोडणारां साठी चे दंड हे दुप्पट, तिप्पट नव्हे तर काही ठिकाणी दसपटीने वाढवलेले आहेत,

खरे म्हणजे सध्याची बेधुंद वाहतूक व अपघात पाहता ते गरजेचेही आहे, परंतु ज्या छुप्या पद्धतीने आणि बऱ्याचदा टारगेट पूर्ण करण्यासाठी चक्क खोट्या पद्धतीने चार चाकी वाहन धारकांचा प्रचंड मोठा खिसा कापला जात आहे., त्यासाठी स्पीडगन : सापळा लावून वाहन धारकांना लुटीचा नवा फंडा वाहतूक शाखेने सुरू केला आहे,
सोबतच्या फोटोमध्ये सुहास भाई मुळे यांच्याच गाडीचे उदाहरण आहे.. या फोटोमधे त्यांच्या गाडीच्या अगदी मागे एक टुव्हिलर दिसते आहे, आणि अगदी पुढे एक टुव्हिलर दिसते आहे,. आणि अगदी शेजारीच चिकटून ट्रक चाललेली दिसते आहे, अशा अवस्थेमध्ये जगातला कोणता माणूस 111 किलोमीटरच्या वेगाने गाडी चालवु शकतो ? हे सामान्य माणूस देखील सांगू शकेल,
तरी देखील अशा अवस्थेतही त्यांच्या गाडीचा स्पीड एकशे अकरा किलोमीटर प्रति घंटा होता.. असा आरोप लावून एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. यावरही अजून एक ताण म्हणजे आपल्या नगर शहरामध्ये पत्रकार चौकांमध्ये सीटबेल्ट लावला नाही म्हणून आठशे रुपये दंडाची चलने आलेले आहे… आपल्या शहरांमध्ये दहा वीस किलोमीटरच्या वेगाने देखील जिथे गाडी चालवता येत नाही, तिथे सीट बेल्टची वसुली म्हणजे दरोडेखोरीच आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाहन चालक या स्पीडगन मुळे चांगलेच हैराण झाले आहेत . अलिकडे शासनाने वाहतूक नियमात मोठे बदल केले आहेत . दंडांच्या रकमा प्रचंड वाढविल्या आहेत . त्याचे चटके पुढे सर्वांनाच असह्य होणार आहेत . त्याची झलक आता कुठे सुरु झाली आहे . . त्या स्पीड यांच्या माध्यमातून लावलेले दंडाचे कारण व रिडिंग बरोबर आहे की चूक आहे याला चॅलेंज करायचा कोणताही मार्ग उपलब्ध ठेवलेला नाही. आता या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी जागरूक नागरिक मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.