जनआधार सामाजिक संघटनेच्या आंदोलनाला यश.

नगर तालुक्यातील. चार वर्षापासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रखडलेले रस्त्याचे काम. आंदोलनाचा इशारा देताच. दहा दिवसात पूर्ण.

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील मौजे निमगाव वाघा ते जाधव मळा वस्ती येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चार वर्षापासून मंजूर असणाऱ्या अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे काम तातडीने सुरू करून ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या वतीने मागील हप्त्यात देण्यात आले होते व सदर रस्त्याचे काम येत्या दहा दिवसात पूर्ण न केल्यास अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता त्या अनुषंगाने रस्त्याचे काम तातडीने चालू करून रस्ता पूर्ण करण्यात आला व रस्त्याची पाहणी करताना जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत नगर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत बोडखे, सचिन जाधव, प्रमोद जाधव, माऊली बोडखे, नवनाथ हरदे, सुशांत जाधव, गणेश जाधव, पै.गणेश फलके आदीसह ग्रामस्त उपस्थित होते.  निमगाव वाघा ते जाधव मळा वस्ती येथील 800 मीटर डांबरीकरणासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मागील ४ वर्षांपूर्वी ३७.२७ लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला होता. व सदर रस्त्याचे काम ३० ते ४० टक्के एवढेच झालेले होते. त्यातही केलेल्या कामात अनेक ठिकाणी पडलेले खड्डे बुजून बीबीएम पूर्ण करून त्यावर,कार्पेट आणि डांबरीकरण करण्याची अंतिम लेयर मारणे हे जवळपास 60 टक्के  रस्त्याचे काम हे अर्धवट होते. या सर्व परिस्थितीस ठेकेदार जबाबदार तर आहेच,त्याहीपेक्षा जास्त भ्रष्ट शासकीय अधिकारी/अभियंते जबाबदार आहेत. कारण त्यांनी ठेकेदारास वेळेवर आवश्यक सूचना दिल्या असत्या तर आज हा संपूर्ण 800 मीटर रस्ता सर्वसामान्य लोकांना रहदारीस योग्य अवस्थेत आणि मागील चार वर्षांपूर्वीच वापरण्यास मिळाला असता, परंतु शासकीय अभियंते/अधिकारी हे ठेकेदाराकडून घेतलेल्या टक्केवारीमुळे त्यांच्याखाली मिन्धे होतात,आणि परिणामी रस्ते कमी वेळेत खराब होणे किंवा रस्ता पूर्ण करण्याआधी ठेकेदारास कामाचे बिल अदा करणे या घटना घडतात आणि याचा थेट परिणाम हा रस्त्याच्या गुणवत्तेवर होऊन सर्वसामान्यांचा पैसा जो टॅक्स च्या स्वरूपात प्रशासनाकडे असतो तो काम व्यवस्थित किंवा पूर्ण न होताच भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या/ ठेकेदारांच्या खिशात जातो,
अशा काम चुकार ठेकेदारांना काम वेळेत न केल्यास त्यांनी भरलेल्या डिपॉझिट जप्त करून त्यांना शासनाच्या काळया यादीत समाविष्ट करून कायमस्वरूपी यापुढे टेंडर भरण्यास मज्जाव केला जाऊ शकतो, असे निवेदनात पोटे यांनी म्हटले होते. या रस्ता संदर्भात मुख्यमंत्री ग्रामसडक अहमदनगर, विभागाने या निवेदना नंतर ही,येणाऱ्या १० दिवसात या रस्त्याचे काम सुरू न केल्यास जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने कार्यालयातील अधिकाऱ्यांना काळे फासून आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले होते, या निवेदनाची  दखल घेत संबंधित विभागाने काम तातडीने चालू करून पूर्ण करण्यात आले असल्याचे प्रकाश पोटे यांनी सांगितले……………….