डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्याची कारवाई तातडीने करावी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा कृती समितीचे आयुक्तांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने प्रस्तावित असलेल्या मार्केटयार्ड चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा कृती समितीच्या वतीने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी कृती समितीचे सदस्य व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते यांनी आयुक्त जावळे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
महापालिकेच्या वतीने मार्केटयार्ड चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठी महापालिकेच्या वतीने मंजूरी मिळाली असून, याचा आराखडा देखील सादर करण्यात आलेला आहे. मात्र पुतळा उभारण्यासाठी पुढील हालचाली होत नसल्याचे हा पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी कृती समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे.