दहिगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

शैक्षणिक साहित्याचा चांगला उपयोग करुन विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधावी - सरपंच मधुकर म्हस्के

नगर – शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. शिक्षणामुळे मनुष्य प्रगल्भ
होतो. प्रत्येक मुलांला शिक्षण मिळावे, यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम
राबवून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहत आणण्याचे काम होत आहे. त्यासाठी
विद्यार्थ्यांना शासनाने मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, वह्या व इतर सुविधा देण्यात
येत आहेत. विद्यार्थ्यांनीही मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा चांगला उपयोग करुन
चांगले शिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक
अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तरीही विद्यार्थी जिद्दीच्या जोरावर यश मिळत
आहेत. शिक्षक व ग्रामस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी
आमचे सहकार्य राहील, असे प्रतिपादन दहिगावचे सरपंच मधुकर म्हस्के यांनी केले.
नगर तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील
विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके, गणवेश वह्या देऊन स्वागत करण्यात
आले. याप्रसंगी सरपंच मधुकर म्हस्के, उपसरपंच मनिषा म्हस्के, ग्रामपंचायत
सदस्य आशिया शेख, शालेय समितीचे अध्यक्ष महेश म्हस्के, सोसायटीचे माजी
चेअरमन महादेव म्हस्के, व्हाईस चेअरमन दत्तात्रय बनकर, रावसाहेब म्हस्के, विजय
आव्हाड, गौतम हंबरडे, निलेश हंबरडे, मुख्याध्यापक श्री.हारदे, शिक्षक सर्वश्री साके,
काळे मॅडम, ठोंबरे, पानसंबळ आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी महेश म्हस्के म्हणाले, जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थीही
कोणत्याच बाबतीत कमी नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना कोणत्याही
अडचणी येवू नये यासाठी शिक्षक व ग्रामस्थांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांची प्रगती
साधली जात असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मुख्याध्यापक श्री.हारदे म्हणाले, शासनाने विद्यार्थ्यांना दर्जेदार
शिक्षण मिळावे, यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना

सर्वोतोपरि शैक्षणिक सुविधा पुरवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधत आहे.
खाजगी संस्थेच्या बरोबरीने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीही यश मिळवत
आहेत. शिक्षक व ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नाने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास
साधला जात असल्याचे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, गणवेश, खाऊ, फुले मिळाल्याने
विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदून गेले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय बनकर यांनी
केले तर मनिषा म्हस्के यांनी आभार मानले.