दिंडीने रेल्वेस्टेशन परिसर बनले भक्तीमय

श्री क्षेत्र सिरसगाव दिंडीचे उत्साहात स्वागत भाविक व वारकर्‍यांमध्ये रंगला फुगड्यांचा फेर

अहमदनगर (प्रतिनिधी)- माउली… माउली… नामाचा जयघोष… तर टाळ मृदंगाच्या गजरात रेल्वेस्टेशन येथील आनंदनगर परिसरात औरंगाबाद येथील श्री क्षेत्र सिरसगाव (ता. वैजापूर) येथील दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडीच्या आगमनाने संपूर्ण रेल्वेस्टेशन परिसर भक्तीमय झाले होते.
दिंडीच्या स्वागतासाठी परिसरातील घरांसमोर सडा, रांगोळ्या टाकण्यात आले होते. दिंडीचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करीत पुंडलीक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकारामचा गजर करण्यात आला. दिंडीत पांढर्‍या पोशाखात भगवे ध्वजे घेऊन सहभागी असलेले वारकरी, तर महिलांच्या डोक्यावर असलेल्या तुळशी वृंदावन अशा शिस्तबध्द संचलन करणार्‍या दिंडीने नागरिकांचे लक्ष वेधले.
या दिंडीत स्थानिक नागरिक, महिला व वारकर्‍यांमध्ये फुगड्यांचे फेर रंगले होते. अ‍ॅड. राजेश कावरे व सौ. संगीता कावरे यांनी ह.भ.प. संजय महाराज दुशिंग, वीणेकरी चांगदेव महाराज भवर यांचे औक्षण करुन सत्कार केला. यावेळी दत्तात्रय कावरे, अशोक कावरे, अहमदनगर शहर वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के, प्रमोद गादिया, राजेंद्र भोसले, सूरज कराळे, प्रसाद जोशी, बाळासाहेब कटारिया, अजित चंगेडिया, ज्ञानेश्‍वर चव्हाण, नगरकर, द्वारका कावरे, सुनंदा कावरे, वर्षा चव्हाण, सीमा कराळे, विद्या धामणे, कल्पना भोसले, जयश्री गादिया, रविषा इथापे, जयश्री खांडेकर, सुरेखा भोसले, नंदा चंगेडिया, सपना पुरुषोत्तमवार, सायली जोशी, आशा नगरकर, नीता गांगर्डे, आरती मेहता, निकिता ताठे, कीर्ती ताठे आदींसह नागरिक उपस्थित होते.