दिल्लीत कोरोनाचे वाढते सत्र 

अरविंद केजरीवालांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आज बोलावली होती.  सर्वपक्षीय बैठकीला अरविंद केजरवील यांच्यासह आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज, भाजपकडून आदेश गुप्ता, काँग्रेसचे अनिल चौधरी आणि जयकिशन उपस्थित आहेत.  दिल्लीमध्ये 28 ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू देखील वाढले आहेत.  सर्वपक्षीय बैठक दिल्ली सचिवालय कार्यालयात सुरु आहे.  अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  केजरीवाल यांनी बुधवारी गुरु तेग बहादूर रुग्णालयाचा दौरा केला होता.

दिल्लीमध्ये 28 ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली.  28 ऑक्टोबरला दिल्लीत 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळली. 11 नोव्हेंबरला 8 हजार कोरोना रुग्ण आढळले होते. कोरोना संसर्गाचे प्रमाण दिल्लीत वाढत असून बुधवारी 7486 कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 131 जणांचा मृत्यू झाला आहे.