गुलाबराव पाटलांची फडणवीसांवर टीका

जळगाव : 

‘देवेंद्र फ़डणवीस’ राज्याचे विरोधी पक्षनेते असल्याने सरकारला सूचना करणे , राज्य सरकारवर टीका करणे, हे त्यांचे कामच आहे. फडणवीस हे चांगले सूचनाकार असून, त्यांनी तेच काम करावे,’ अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

 
जळगाव मधील  जिल्हा परिषदेत जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर गुलाबराव पाटील हे माध्यमांशी बोलत होते.  राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत.  वाढीव वीजबिलासह अनेक मुद्द्यांवरून फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला आहे.  महाविकास आघाडीचे सरकार सावकारी वृत्तीचे असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती.  त्याचा समाचार मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात घेतला आहे.   
 
जोपर्यंत फडणवीस बोलत नाही, तोपर्यंत आम्हाला सूचना कळत नाहीत, ते चांगले सूचनाकार असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली.