नगरमध्ये जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस…..

शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान !!

अहमदनगर: मेट्रो न्यूज  
नगर जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस अनेक भागांमध्ये पडला अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालेले दिसून आले . अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे.  नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारांचा पाऊस सर्वत्र पाहायला मिळाला.

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली . तसेच भाजीपाला विक्रेत्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आली. त्यातच दहावी – बारावी परीक्षा चालू असून अचानक आलेल्या पावसाने विद्यार्थ्यांचेही हाल झाले आहे. पावसामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी गाळ मिश्रित पाणी वाहू लागले आहे.यामुळे पालिकेची नालेसफाई न झाल्याचे पितळ उघडे पडले आहे.

हवामान खात्याने गेल्या आठवड्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलेला होता यानंतर जिल्हा प्रशासने  सुद्धा दोन दिवसापूर्वी नागरिकांना आवाहन केले होते.या अगोदर तीन दिवसापूर्वी अशाच पद्धतीने जोरदार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र दाणादाण उडाली होती यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते.

आज दुपारी नगर तालुक्यामध्ये निमगाव वाघा, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी, नगर, पाथर्डी यासह नगर शहरांमध्ये जोरदार गारांसह पावसाने हजेरी लावली . नगर शहरासह सावेडी,  केडगाव या सर्व विविध ठिकाणी जोरदार पाऊस सुरू होता . तब्बल अर्धा तास चाललेल्या या जोरदार पावसामुळे अनेकांची दाणादाण उडाली . त्यातच अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचलेले दिसून येत होते. आजच्या पावसामुळे सुद्धा शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.