निमगाव वाघात जागतिक दिव्यांग दिवस साजरा

दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

निमगाव वाघा (ता. नगर) येथे जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. गावातील नवनाथ विद्यालयात स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर सार्वजनिक ग्रामीण वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने गावातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


तसेच उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेत 58 किलो वजन गटात पै. महेश बबन शेळके याने कास्यपदक पटकाविल्याबद्दल त्याचा यावेळी सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, दत्तात्रय जाधव, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, पै. विकास निकम आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती हे समाजातील एक घटक आहे. अनेक दिव्यांग बांधवांनी परिस्थितीवर मात करुन आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. दिव्यांगामध्ये अनेक सुप्त कलागुण दडलेले असतात. दिव्यांगांनी स्वत:मध्ये कमीपणाचा न्यूनगंड न बाळगता ध्येय समोर ठेऊन वाटचाल करण्याचे आवाहन केले. तर दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.