निमगाव वाघात श्री क्षेत्र दैठणे गुंजाळच्या खंडेश्‍वर दिंडीचे स्वागत वारकर्‍यांना पिशव्यांचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री खंडेश्‍वर दिंडीचे  निमगाव वाघा (ता. नगर) येथे येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व निमगाव वाघा ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
दिंडीतील वीणेकरी ह.भ.प. बबन गुंजाळ व ह.भ.प. विनायक महाराज काळे यांचा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी सत्कार केला. यावेळी सरपंच साहेबराव बोडखे, नामदेव फलके, भागचंद जाधव, राम जाधव, भरत बोडखे, भाऊसाहेब जाधव, गोरख चौरे, श्याम जाधव, विजय जाधव, संतोष फलके, बन्सी जाधव, किरण शिंदे, बापू फलके, अजय ठाणगे, कोंडीभाऊ फलके, संदीप डोंगरे, अशोक कापसे, सिताराम येवले, रवी फलके, गोरख वाबळे, अनिल झावरे, सुनिल गुंजाळ, राजू पवार आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्वागत कार्यक्रमात दिंडीतील वारकर्‍यांना साहित्य ठेवण्यासाठी पिशव्या व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. दिंडीतील बापुसाहेब गुंजाळ, मल्हारी कळमकर, बापुराव ढोणे, गंधे काका, बबन गुंजाळ, रोहिदास पादीर यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन सामाजिक संस्था व निमगाव वाघा ग्रामस्थांचे आभार मानले.