स्नेहालय संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांद्वारे मोफत नेत्रसेवा

संस्थेच्या सर्वाना मिळेल नेत्रसेवा मधून मोफत चष्म्याचा नंबर

अहमदनगर दि.२८ ऑक्टोबर २०२०:

अनाथाश्रमात शिकताना मिळालेल्या समाजाच्या   मदतीची  अंशतः परतफेड करण्यासाठी  शुभम शोर  आणि मिरेन   गायकवाड या  नवउद्योजकांनी मोफत नेत्रसेवा करणार आहेत . त्यांनी आता आजन्म मोफत डोळे तपासण्याचा संकल्प केला आहे.  स्नेहालय नेत्रसेवा, या चष्म्याच्या दुकानामुळे आता नगरमध्ये  कोणालाही  मोफत डोळ्याचा नंबर तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

संस्थेच्या सर्वाना मिळेल नेत्रसेवा मधून मोफत चष्म्याचा नंबर

या केंद्रामुळे कुठल्याही अनाथाश्रमातील अनाथ-निराधार  अशा विद्यमान आणि माजी विद्यार्थ्यांना ही सेवा मिळते .  तसेच समस्याग्रस्त महिलांना डोळे मोफत तपासून चष्माही  येथे मोफतच दिला जातो.

डोळे मोफत तपासून मिळत असले तरी  कुठूनही चष्मा घेण्याची मुभा ग्राहकाला असते.  झोपडपट्टीतील आणि कष्टकरी  लोकांसाठी फक्त १९९/- रुपयात डोळे तपासून चष्मा मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.  सर्व  कर्मचारी , कार्यकर्ते , युवा निर्माण प्रकल्पाचे स्वयंसेवक आणि त्यांचे कुटुंबीय यांनाही  केवळ १९९/- रुपये मध्ये चष्मा मिळतो.

इतरांना फक्त २९९ रुपयात मिळेल डोळे तपासून

इतर कुठल्याही ग्राहकांना स्नेहालय नेत्रसेवा द्वारे फक्त २९९/- रुपयात डोळे तपासून चष्मा मिळतो.

येथील हजारो फ्रेम्स  मधून आवडीची, उत्तम फ्रेम निवडून चष्मा बनवून दिला जातो.  डोळे तपासण्याचे  अद्ययावत ए. आर .मशीन, तसेच इतर सर्व यंत्रसामुग्री येथे या तरुणांनी उपलब्ध केली आहे.  कॅप्टन राजाभाऊ कुलकर्णी मार्ग, जुना मंगळवार बाजार, अहमदनगर येथे स्नेहालय नेत्रसेवा उपक्रम सुरू झाला आहे .

स्नेहालयात मिळतील नेत्रदानाचे अर्ज

स्नेहालय पुनर्वसन संकुल, जी.के. एन. पुनर्वसन संकुल ,हिंमत ग्राम, सत्यमेव जयते ग्राम, येथील लाभार्थ्यांपासून आपल्या नेत्रसेवेला शुभम आणि मीरेन  यांनी  प्रारंभ केला.  मिरेन 9767969828, 9011028898,9156969828 या मोबाईल क्रमांकांवर उपलब्ध आहेत. अनामप्रेम संस्थेसोबत नेत्रदानाचे अर्ज येथे भरून घेतले जातात.

 शुभम  याला डोळ्यांची तपासणी करणे ,चष्मा बनविण्याच्या (Optimetry ) अभ्यासक्रमात स्नेहालय चे  पालक कार्यकर्ते  भारत कुलकर्णी यांनी प्रवेश घेऊन दिला.  त्याचे शुल्क स्नेहालय ने भरले. परंतु व्यवसाय करण्यासाठी केवळ पदवी उपयोगी नसते. प्रत्यक्ष  काम शिकणे गरजेचे असते. मुळचे अहमदनगर येथील प्रसन्न  जोशी यांनी  शुभमची जबाबदारी स्वीकारली. पुणे येथे बालगंधर्व चौकात श्रेयांश ऑप्टिकल, या नावाची त्यांची प्रसिद्ध  फर्म आहे.

प्रसन्न यानी ८ महिने मेहनत घेऊन शुभमला चष्मा बनविण्याच्या विद्येत पारंगत केले.  नेत्रसेवेच्या क्षेत्रात एक नवी चळवळ यानिमित्ताने अनाथ मुले उभी करीत आहेत.

आयुष्यात पायावर स्थिर होण्यासाठी धडपडणार्‍या असंख्य अनाथ मुलांसाठी शुभम आणि मीरेन एक प्रेरणा बनले आहेत.