पक्षी सप्ताह दिनानिमित्त पक्षीनिरीक्षक व पक्षीमित्र डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचे व्याख्यान

सुरक्षित व शांत ठिकाणी पक्षी घरटी बांधतात पक्षीमित्र डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचे प्रतिपादन

नगर प्रतिनिधी

५ नोव्हेंबर हा अरणॠषी जंगल वाचणारे मारुती चितमपल्ली यांचा वाढदिवस व १२ नोव्हेंबर हा पद्मभूषण दिवंगत डॉ.सलीम अली यांची जयंती

या दोन  महान अभ्यासकाच्या स्मरणार्थ हा पक्षी सप्ताह आयोजित केला आहे.

नगर शहरात उपनगरात झाडे आहेत त्यामुळे या भागात विविध रंगीबेरंगी विविध प्रजातीची पक्षी पहावयास मिळतात

जसा माणूस हा किचन बेडरूम हॉल अशा घरात राहतो  त्याप्रमाणे पक्षी पण तीन प्रकारात राहतो पक्षाची खाणे,रहाणे, बसण्याची जागा वेगवेगळी असते

कारण जिथे राहतो ती जागा सुरक्षित व शांत अशा ठिकाणी ती घरटी बांधतो.असे प्रतिपादन  पक्षीनिरीक्षक व पक्षीमित्र डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांनी केले.

५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर पक्षी सप्ताह दिनानिमित्त स्नेह ७५ व विश्वशाली ग्रुपच्या वतीने पक्षीनिरीक्षक व पक्षीमित्र डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचे व्याख्यान व सत्कार गुलमोहर रोडवरील हॉटेल सायंतारा येथे आयोजित केला होता.

यावेळी विश्वनाथ पोंदे,अजित चाबुकस्वार,डॉ.प्रविण रानडे, ईश्वर सुराणा, दिलीप डावरे,सौ.जयश्री डावरे,अनुराधा थिटे,प्रार्थना रानडे,डॉ.सौ.अस्मिता अष्टेकर, सागर अष्टेकर आदी उपस्थित होते.

सुधाकर कुऱ्हाडे पुढे म्हणाले,साधारणतः नगरमध्ये चांदबीबी महल,भुईकोट किल्ला,कापूरवाडी, पिंपळगाव तलाव,बागेत,घरात, घरातील कपडे टाकण्यांच्या तारेवरही पक्षी घरटी करतात.

थंडीच्या दिवसात पक्षी हा हजारो किमीचा टप्पा पार करून अनुकुल प्रदेशाच्या शोधात स्थलांतराच्या ठिकाणी येतात.

निसर्गात पक्षी पहाताना त्यांना कसा त्रास होणार हे पाहिले पाहिजे.

संक्रातीत पतंग मांजा अडकून पक्षी मरतात.विविध पक्षी संघटनेमुळे आज चिमणीची संख्या वाढली आहे.

चिमणी,कबुतर,सातभाई,बुलबुल, किंगफिशर,राखी वटवटया सारखे बाबतचे विविध माहीतीसह गंमतीजंमती, किस्से त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.प्रविण रानडे यांनी प्रास्ताविक केले. विश्वनाथ पोंदे यांनी पाहुण्याचा परीचय करून दिला. सौ.जयश्री डावरे यांनी आभार मानले.