बिहार निवडणुकीमध्ये विजयासाठी भाजपाची घोडदौड सुरूच 

बिहार :
 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला  सुरुवात झाली आहे.  मतमोजणीमध्ये एनडीएनं जोरदार मुसंडी मारली आहे. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीवरून राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात  महाआघाडीने 102 जागांवर आघाडी मिळवली आहे.  एनडीए 125 जागांवर आघाडीवर आहे.  सुरुवातीच्या कलांमध्ये राजदनं 58, काँग्रेस 21, इतर 19 आणि एनडीएकडून भाजप 67 आणि जेडीयू 48  जागांवर आघाडीवर आहे.   बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.  बिहार निवडणुकीच्या निकालाविषयी सामनामधून राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.

बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपनं संघटन उभारलं आणि पाच वर्षात जे काम झालं याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश मंत्री आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. एनडीएला लोकांनी भरभरून मते दिली. त्यामुळंच एनडीएची सत्ता पुन्हा बिहारमध्ये आलीय. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली आणि त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून आल्याचेही बावनकुळे यांनी सांगितलं.