परकीय चलन साठ्यातही सोन्याचे प्रमाण वाढले
सोने दुपट महाग, तरीही लोकांची पाच वर्षांमध्ये 40% जास्त खरेदी
सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठल्याने सोन्याची खरेदी कमी झाली असावी,असे तुम्हाला वाटत असेल तर ते आकडे नक्की बघा 2019 मध्ये प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत 35 हजार 220 रुपये होती. आता 72 हजार रुपयांवर आहे. असे असूनही मार्च 2019 च्या तुलनेत मार्च 2024 मध्ये देशांतर्गत सोन्याचा साठा २९२ मॅट्रिक टनावरून 408 मॅट्रिक म्हणजे 40% वाढलेला आहे. याच कालावधीत देशातील सोन्याचा 612 मेट्रिक टनावरून 822 मीटर इतका वाढला आहे. आरबीआयच्या ताज्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. परकीय चलनाच्या साठ्यातील सोन्याचा वाटा देखील 23 सप्टेंबरच्या 7.37 वरून 24 मार्चमध्ये 8.15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याने सुमारे 13 टक्के परतावा दिला आहे. तर चांदी 11 टक्के एवढी वाढली आहे. गोल्डमॅन सेक्सच्या मते 12 महिन्यात सोन्याच्या किमती 6% पेक्षा जास्त वाढू शकतात. सोन्यामधील वार्षिक परतावा एक वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षात सेनेक्स पेक्षा जास्त राहिलेला आहे