पाऊस लांबला शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका

अहमदनगर : यंदा मान्सून नियमित वेळेच्या चार ते पाच दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळे पुढेही मान्सूनची गती अशीच राहील. या आशेवर काही शेतकऱ्यांनी धूळपेरणीला सुरुवातही केली. जिल्ह्यातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊसही बरसला. मात्र अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळान मान्सूनच्या गतीवरही परिणाम झालेला आहे. त्यामुळे मान्सून लांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘खरीप हंगामातील पेरण्याची शेतकऱ्यांनी घाई करू नये’ असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.