वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यातून मोशन कॅमेरे व बोकड चोरी

बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा

अहमदनगर :

 

गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यात या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांवर हल्ला करून त्यांना ठार मारण्याच्या घटना लागोपाठ घडल्या आहेत.  याच पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे.  या भागातील ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी बिबट्याला ठार करण्याची मागणी केली आहे.

राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही या भागास भेट दिली.  येत्या दहा दिवसांत बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशा सूचना त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.  तर दुसरीकडे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यातून मोशन कॅमेरे आणि बोकड चोरीची घटना घडली आहे.
वन विभागाची पथके कार्यरत झाली असून ड्रोनद्वारेही याचा शोध सुरू आहे. पिंजऱ्यात येत नसल्याने डार्ट मारून त्याला पकडण्याचीही तयारी करण्यात आली आहे.  मात्र, विस्तीर्ण डोंगर दऱ्या, जंगल, शेतातील पिके यामुळे शोध कार्यात अडचणी येत आहेत.
आमदार मोनिका राजळे यांनही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा –

माजी सैनिक, विधवांकरिता घरपट्टी, मालमत्ता कर माफीसाठी  बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना राबविणार

राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफीच्या योजनेस मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

संरक्षण दलातील शौर्यपदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना नागरी भागातील घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्याची तरतूद नगर विकास विभागाने केली आहे.  त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागाने देखील ग्रामीण भागातील अशा माजी सैनिकांच्या विधवांना एकच निवासी इमारतीस करातून माफी देण्याची तरतूद केली आहे.  मात्र, नागरी व ग्रामीण क्षेत्रातील सर्वच सैनिकांना मालमत्ता करातून सवलत देण्याची तरतूद नसल्याने अशी मागणी करण्यात येत होती. या दोन्ही विभागांच्या योजनांचे एकत्रिकरण करून त्याला मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्यात आले असून यामुळे  नागरी व ग्रामीण भागातील माजी सैनिकांना मालमत्ता करातून देखील सूट मिळेल.

 

https://youtu.be/koemSj2SxR4