फिनिक्स फौंडेशन व जिल्हा रुग्णालयाने केली वारकर्‍यांमध्ये नेत्रदान, अवयवदान, देहदान जनजागृती

वारी निर्मलवारी...निरोगी वारी व्हावी- हभप जंगले महाराज शास्त्री

         नगर – लाखो वारकरी आपले सर्वस्व विरुन 15-20 दिवस पायी तहान-भुक विसरुन उन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता शेकडो किलोमीटर चालत पंढपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनास जातात. ही वारी निर्मलवारी.. निरोगी वारी व्हावी, यासाठी अनेक सामाजिक संस्था मानवसेवा हीच पांडुरंगाची सेवा मानून करत आहे.   फिनिक्स फौंडेशन व जिल्हा रुग्णालय नगर या माध्यमातून 12 वर्षेपासून दिंडी आरोग्यसेवा व नेत्र जनजागृती चळवळ राबवत आहेत. दिंडीतील वारकर्‍यांना आरोग्य सेवा पुरविण्याचे काम हे आरोग्य दूत करत आहेत. त्याचबरोबर नेत्रदान, अवयवदान, देहदानाबाबत जागृती करण्यात येत आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी एकत्रित येत असल्याने त्यांच्यातील समज-गैरसमाज दूर होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन हभप जंगले महाराज शास्त्री यांनी केले.   नक्षत्र लॉन येथून पायी दिंडी प्रस्थान झालेल्या ज्ञानेश योग आश्रम डोंगरगण अहमदनगर, नगर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात फिनिक्स फौंडेशन व जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान, अवयवदान, देहदान जनजागृती  करण्यात आली. याप्रसंगी   हभप जंगले महाराज शास्त्री, फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, जिल्हा रुग्णालयाचे नेत्रदान समुपदेशक सतीष आहिरे, माजी महापौर भगवानराव फुलसौंदर, नगरचे तहसीलदार उमेश पाटील, अशोक कानडे, एस.टी. बोरुडे, केमिस्ट असोसिएशनचे सागर फुलसौंदर, अवधूत फुलसौंदर, नक्षत्र मेडिकलचे कृष्णा फुलसौंदर, महेंद्र वारुळे आदींसह वारकरी मोठया संख्येने उपस्थित होते. ावेळी वारीतील सहभागींना औषधीं किटचे वाटप करून नेत्रदान अवयवदान जनजागृती संदेश देण्यात आला. याप्रसंगी प्रथम महापौर.भगवानराव फौलसौंदर म्हणाले,  वारकर्‍यांची सेवेत पांडुरंगाची सेवा मानून  होत असलेली ही सेवा पांडूरंग चरणी अर्पण होत आहे. आरोग्याबाबत जनजागृतीच्या उपक्रमातून गैरसमज दूर होण्यास मदत होणार असल्याने अशा उपक्रमांची समाजाला गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी जालिंबर बोरुडे म्हणाले, आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या आठही दिशांकडून भक्तांचा महापूर पंढरपुरास येतो. या वारकर्‍यांचे आरोग्य अबाधित रहावे, यासाठी त्यांचे आरोग्य तपासणी करण्यात येऊन, औषधी किटचे वाटप करण्यात आले आहे. नेत्रदान, अवयवदान, देहदान जनजागृती करुन लाखो वारकर्‍यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला असल्याचे सांगितले. यावेळी सतिष आहिरे यांनी नेत्रदान, अवयव दान, देहदाना विषयी व  जिल्हा रुग्णालयाच्यवतीने वारकर्‍यांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.