भाग्योदय विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

मुलांच्या भविष्यासाठी पालकांनी शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे - प्रा.प्रसाद बेडेकर

 नगर –    आपला पाल्यास शिक्षण घेतांना कोणत्याही अडचणी येऊ नये, त्याला सर्वकाही मिळावे, यासाठी पालकांची धडपड असते. शिक्षकही आपला विद्यार्थी सर्वत्तोम व्हावा, यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे मुलाच्या प्रगतीची माहिती मिळवून त्यादृष्टीने नियोजन करणे सोपे होते. शिक्षकांवर विश्वास ठेवून त्यांच्या सूचनांचे पालन केल्या विद्यार्थ्यांचीही प्रगती होते. गरजेच्या गोष्टी पुरवा पण मुलांवर अवास्तव अपेक्षा लादू नका आणि लाडही करु नका. अभ्यासबरोबरच खेळ, इतर क्षेत्राचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. वास्तवादी जीवन जगण्याचे धडे शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना द्यावे, त्यामुळे स्वत: निर्णयक्षम होऊन चांगल्या-वाईट काय हे त्याला कळेल. पालक-शिक्षकांच्या समन्वयातूनच विद्यार्थ्यांचे भविष्य घडले जाईल. भाग्योदय विद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचा आलेख असाच उंचावत राहील, असे प्रतिपादन प्रसिद्ध निवेदक प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले. केडगांव येथील भाग्योदय विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी प्रा.बेडेकर बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, मुख्याध्यापक बन्सी नरवडे, पालक प्रतिनिधी सौ.माने आदि उपस्थित होते.याप्रसंगी प्राचार्य ज्ञानदेव बेरड म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी संस्थाचालक, शिक्षक हे प्रयत्नशील आहेत. प्रत्येक वर्गाचे शालेय व सहशालेय वार्षिक नियोजन केले जात असल्याने विद्यार्थ्यांची प्रगती साधली जात आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना विविधा स्पर्धा परिक्षा, क्रीडा, सांस्कृतिक प्रकारासाठी प्रोत्साहित करुन त्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. विशेषत: 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांची चांगली तयारी करुन घेतली जात आहे. यात पालकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पालकांनी – शिक्षकांशी संवाद साधल्यास नक्कीच आपला विद्यार्थी यशस्वी होईल, असे सांगितले.यावेळी संस्थेचे सचिव म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्थेच्यावतीने सर्वोतोपरि सुविधा पुरविण्यात येत आहेत. शिक्षण घेतांना मुलांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी मदतही केली जात आहे. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचा विकास साधला जात असल्याचे सांगितले. प्रास्तविकात बन्सी नरवडे यांनी विद्यालयाच्या वार्षिक आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पांडूळे यांनी केले तर आभार गोविंद कदम यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक पोपट येवले, साहेबराव कार्ले, सोपान तोडमल, बाबासाहेब कोतकर, धनंजय बारगळ, रुपाली शिंदे, संतोष काकडे, आदिनाथ ठुबे, एकनाथ होले, बबन कांडेकर, गणेश गायकवाड, बाळासाहेेब कावरे, सुधाकर गायकवाड आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी इ.1 ली ते 12वी मधील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

——-