मा.महापौर तथा अहमदनगर लोकसभा निवडणूक प्रमुख बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने मोदी सरकारच्या ९ वर्ष पूर्ती निमित्त योजना पत्रकाचे अनावरण.

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सरकारचे नऊ वर्षाचा काळ पूर्ण झाल्या निमित्ताने सेवा सुशासन व गरीब कल्याण पर्व अशा अनेक शासनाच्या विविध योजनांचे पत्रकचे अनावरण करून नागरिकांना वाटप करण्यात आले यावेळी मा. महापौर तथा अहमदनगर लोकसभा निवडणूक प्रमुख बाबासाहेब वाकळे समवेत भाजपाचे प्रदेश निमंत्रित सदस्य अँड.विवेक पा नाईक, सावेडी शक्ति केंद्रप्रमुख पुष्कर कुलकर्णी, निलेश जाधव, शिवा आढाव, रवी चव्हाण, नामदेव बोरुडे, देविदास शेवाळे, जाकीर पठाण, हर्ष नाईक आदी उपस्थित होते.                   या प्रसंगी मा.महापौर वाकळे म्हणाले की सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनेने अंत्योदय हेच ब्रीद वाक्य घेत नारी तू नारायणी, महिला सक्षमीकरण येजना, निरोगी जीवन प्रत्येकाचा हक्क, मध्यमवर्गीय जीवन सोपे,  सक्षम भारत, सक्षम शेतकरी समृद्ध भारत योजना, भारतातील अमृत पिढी सक्षम बनते योजना, पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास योजना, ईशान्य कडील राज्याचा इतिहासिक विकास, सांस्कृतिक वारसाचे नवीन युग अशा विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण करून नागरिकांना वाटप करण्यात आले तसेच या मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत ८० कोटी लोकांना मोफत रेशन वाटप, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घरे देण्यात आली तसेच ११.८ कोटी घरापर्यंत पोहोचवले नळाचे पाणी आणि शंभर टक्के घरांमध्ये वीज पोहोचवली. ४८.३ कोटी जनधन खाती उघडून गरिबांना बँकिंग प्रणालीमध्ये सामावून घेतले, आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गासाठी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण सुनिश्चित केले गेले व प्रधानमंत्री स्वा निधी योजनेअंतर्गत ३४ लाख पठारी विक्रेत्यांना कर्ज वाटप करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची आर्थिक मदत चालू करण्यात आली असून प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत ३७.५ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे व प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत ५७ लाख शेतकऱ्यांना लाभ दिला. तसेच रोजगार मिळावे अंतर्गत ७१ हजारहून अधिक नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले आहे अशा विविध योजनेचे अनेक शेतकरी व गरजूंना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून अशा विविध योजना भाजपा सरकार राबवत असल्याचे सांगीतले………