रुपीबाई मोतीलालजी बोरा स्कूलच्या दीड हजार विद्यार्थ्यांचा योग सोहळा

विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य व एकाग्रतेसाठी योग आणि ध्यानचे धडे आंतरराष्ट्रीय योग दिवसचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अ.ए.सो. च्या रुपीबाई मोतीलालजी बोरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दीड हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त पद्धतीने धडे देऊन त्याचे महत्त्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील योगाचे विविध आसने उत्तमपणे सादर केले.
संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा व खजिनदार प्रकाश गांधी यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार बारगळ, उपप्राचार्य सुवर्णा वैद्य, पर्यवेक्षिका सौ. संतोष मुथा यांच्या उपस्थितीत हा योग सोहळा पार पडला. मनीषा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या एकाग्रतेसाठी ध्यानचे महत्त्व सांगितले. क्रीडा अध्यापिका अंजली वल्लाकट्टी यांनी योगाचे विविध आसने प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांकडून करुन घेतले. तर योगाचे निरोगी आरोग्यासाठी महत्त्व विशद केले.