विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने पालावरील मुलांसाठी दररोज कार्यशाळा

 नगर –    विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने अरणगांव रोडवर यवतमाळ येथून मजुरीसाठी आलेल्या कुटूंबातील मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारुन दररोज एक तास कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी संस्थापक अंकुश आघाव यांनी  घेतला.

     याप्रसंगी अंकुश आघावा यांनी सांगितले, आज नगरमध्ये इतर जिल्ह्यातून मजुरीसाठी कुटूंब स्थलांतरीत झाले आहे. काही मजुर हंगामी तर काही कामपुर्ण होईपर्यंत राहत असतात. त्यामुळे त्यांची मुला-मुलींना शाळेत पाठवत नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अशा मुलांचे पालकत्व विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने घेण्यात येऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे. अरणगांव येथे मजूरीसाठी आलेल्या कुटूंबातील मुलांना दरदरोज एक तास शिक्षण देण्यात येणार आहे, असेच आसपासच्या पालावरील मुलांसाठी अशा स्वरुपाचे वर्ग घेण्यात येणार आहे. या कार्यात मदत करु इच्छिणार्‍यांनी मो.89756 19017 वर संपर्क साधावा, असे आवाहन केले.