संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप

शैक्षणिक साहित्याचा चांगला उपयोग करुन भविष्य उज्वल करावे- जितेंद्र लांडगे

नगर – कल्याण रोड, ड्रिम सिटी मागील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण
मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी
पाठ्यपुस्तके, गणवेश, स्कूल बॅग, शूज देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी
शालेय शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे, शिक्षण समितीचे सचिव विक्रम
पाठक, पदाधिकारी कृष्णा बागडे, संचालिका सौ.वनिता पाटेकर, छाया साळी,
मुख्याध्यापिका सौ.कल्पना भामरे आदिंसह शिक्षक वृंद उपस्थित होते.
याप्रसंगी चेअरमन जितेंद्र लांडगे म्हणाले, संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना
सर्वप्रकारच्या सुविधा पुरविण्यात येत आहे. मोफत पाठपुस्तके व शैक्षणिक साहित्य
विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर विविध
स्पर्धामध्ये सहभागासाठी प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी
प्रयत्नशिल आहोत. विद्यार्थ्यांनीही मिळालेल्या साहित्याचा चांगला उपयोग करुन
आपले शैक्षणिक भविष्य उज्वल करावे, असे आवाहन केले
मुख्याध्यापिका कल्पना भामरे यांनी शाळेच्या कार्याचा आढावा सादर करुन
शैक्षणिक वर्षांत राबविण्यात येणार्‍या प्रमुख उपक्रमांची माहिती दिली. शिक्षकवृंदांनी
मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, फुगे देऊन स्वागत केले. रांगोळी, सजावट
केलेले वर्गात मुले उत्साहात सहभागी झाले होते.
एलकेजी, युकेजी, इयत्ता 1 ली ते 9 वी. असे सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय
साहित्य देण्यात आले. त्याबरोबरच गुलाबपुष्प, खाऊ वाटप, जोकरच्या उड्या पाहून
त्यांच्या चेहर्‍यावर आनंद पाहून सर्वांचे मन भरभरून आले.
सूत्रसंचालन राजेंद्र गर्जे यांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षक जगन्नाथ
कांबळे यांनी मानले. यावेळी सुशिलकुमार आंधळे, चंदा कार्ले, विदया नरसाळे, सौ.
मड्याल, सौ. केदारे, श्वेता राऊत आदिंसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक
उपस्थित होते.