समस्त फुले. शाहू. आंबेडकरी. साठे. चळवळीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन.

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा नगर शहरात आहे त्या ठिकाणी पूर्ण कृती पुतळा बसवण्याची मागणी- सुमेध गायकवाड.

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरांमध्ये मनपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा देखील पूर्ण कृती पुतळा नगर शहरात सिद्धार्थ नगर येथील साठे चौकात आहे त्या ठिकाणी बसवण्याच्या मागणीसाठी समस्त फुले.शाहू. आंबेडकरी.साठे.चळवळीच्या वतीने मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड समवेत सोमा शिंदे, संपर्कप्रमुख नितीन कसबेकर, महिला जिल्हा अध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे, शोभा गाडे, महेमूदा पठाण, किरण जाधव, एकनाथराव गायकवाड, रेखा डोळस, रवींद्र तपासे, स्वप्निल भिंगारदिवे, शाहिद शेख , संघराज गायकवाड , प्रज्ञाशील पाटेकर आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    पुढे निवेदनात म्हटले आहे की. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, स्वतंत्र भारतासाठी चले जाव चळवळीत झोपून देणारे थोर स्वातंत्र सैनिक महान साहित्यिक ज्येष्ठ कामगार नेते कॉ.अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा सिद्धार्थ नगर येथे असून त्यांची स्थापना मा. नगरसेवक स्व.गणपतराव शेकटकर (बाबूजी) यांनी व सर्व समाज बांधवांनी केली. नगर शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त त्यांना मानणारा समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतो अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्या ठिकाणी पूर्ण कृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी समस्त फुले शाहू आंबेडकरी साठे चळवळीच्या वतीने करण्यात आली असून मनपा प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे…