साई सर्जिकल अ‍ॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेसच्या नूतन दालनाचा शुभारंभ

40 वर्षाच्या सेवेनंतर परदेशातील अद्यावत तंत्रज्ञान घेऊन दुसरी पिढी सेवेसाठी सज्ज

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सर्वप्रथम श्रवण यंत्राची सेवा देणार्‍या साई सर्जिकल अ‍ॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेसच्या पत्रकार चौक येथील नूतनीकरण झालेल्या दालनाचे शुभारंभ राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते झाले. यावेळी नितांत केवळ, मंगेश केवळ, दत्तात्रय केवळ, मंजुषा केवळ, कु. निधी केवळ, माजी तहसिलदार सुरेश केवळ, डॉ. चंद्रकांत केवळ, डॉ. धैर्यशील केवळ, किशोर डागा, करडे, प्रा. एस.आर. जोशी, श्रीकांत मांढरे आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, पूर्वी श्रवण दोष असलेल्या रुग्णांना तपासणी व मशीन घेण्यासाठी मुंबई व पुणे येथे जावे लागत असे. मंगेश केवळ यांनी ग्राहकांची गरज ओळखून शहरात सुरु केलेल्या सेवेचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे. अनुभव, विश्‍वास व सर्वोत्तम सेवेने साई सर्जिकल अ‍ॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेस नावरुपास आली आहे. या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत त्यांची दुसरी पिढी उतरली आहे. श्रवण दोष असलेल्या जन्मजात बालकांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींची अद्यावत पध्दतीने तपासणीची सोय शहरात झाली असून, त्याचा फायदा नगरकरांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगेश केवळ म्हणाले की, तब्बल 40 वर्षाच्या सेवा देत असताना त्याला अद्यावत तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये मास्टर कोर्स पूर्ण करुन परदेशातील अद्यावत तंत्रज्ञानाने पारंगत झालेला नितांत केवळ हा आपली सेवा देण्यासाठी सज्ज झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
नितांत केवळ याने जन्मजात श्रवणदोष असलेल्या बालकांची तपासणी ही अत्यंत अवघड गोष्ट ठरते. ऐकता येत नसल्याने लहान मुले प्रतिसाद देत नाही व त्यांना विविध ज्ञान देखील अवगत करुन घेता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांची योग्य तपासणी करुन त्यांना श्रवणयंत्र उपलब्ध झाल्यास त्यांचा सर्वांगीन विकास साधणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन साई सर्जिकल अ‍ॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेसच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.