केडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सामाजिक उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी….

केडगाव ग्रामस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. केडगाव हद्दीतील सर्व जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटपाच्या उपक्रमाचे प्रारंभ जगदंबा जिल्हा परिषद शाळा येथून करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते अजित (दादा) कोतकर, अण्णासाहेब शिंदे, शुभम गायकवाड, नगरसेवक मनोज कोतकर, विशाल भिंगारदिवे,ओमकार कोतकर, बाळू शिंदे, भरत मतकर, निखील निकाळजे, राजन कदम, सागर ठोंबे, करण सुर्वे, बंटी विरकर, बाळू गमरे, आर्यन ठोंबरे, किशन काकडे, अक्षय ठोकळ, अक्षय सुर्वे, अनिकेत साठे, शुभम साके, आयुष काकडे आदींसह केडगाव ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
अजित दादा कोतकर म्हणाले की, सर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे माध्यम असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाला शिक्षणाचा संदेश दिला होता. त्यांच्या संघर्षातून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. गरजू घटकातील मुलांना शिक्षणासाठी दिलेले प्रोत्साहन बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अण्णासाहेब शिंदे यांनी समाजाच्या विकासासाठी सर्वसामान्य घटकांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सांगितले. शुभम गायकवाड म्हणाले की, लहान विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून, उज्वल भवितव्याच्या दृष्टीकोनाने त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. नगरसेवक मनोज कोतकर यांनी महामानवाच्या विचाराने घेतलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले.