आमदार ‘निलेश लंके’ यांच्या वाढदिवसानिमित सायकल चे वाटप….

अहमदनगर : मेट्रो न्यूज

पारनेर चे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसा निमित निघोज येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते खा. शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खा. शरद पवार यांचा , आ.निलेश लंके प्रतिष्ठान , तसेच ग्रामस्थ यांच्या  वतीने सत्कार करण्यात आला.  या  कार्यक्रमानिमित्त बाबासाहेब कवाद निघोज , नागरी सहकारी पतसंस्थेचे नामकरण आणि  विकास कामांचे उद्घाटन खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी 7000 गरिब विद्यार्थ्यांना सायकल चे वाटप करण्याचा उपक्रम मा. खा.शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी स्वतः आमदार निलेश लंके हे  ढोल-ताशाच्या आणि डीजे वरील गाण्याच्या आवाजात सायकल वर कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले होते.