आमदार सत्यजीत तांबे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार

नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचा अहमदनगर शहरात आभार दौरा होता. याप्रसंगी ते शहरातील सर्वच पक्षातील मतदार व कार्यकर्यांचे आभार मानण्यात आले. मुकुंदनगर येथे भेट दिली असता मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार  करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक समवेत राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, चाँद सुलताना हायस्कूलचे संचालक हाजी.वाहब सय्यद, जी.एन. शेख, भैय्या बॉक्सर, अजहर सय्यद, चिरागोद्दीन (पप्पूभाई) काझी, फकीरमोहम्मद तांबोळी, युवा नेते शहानुर जहागिरदार, सलमान जहागिरदार, बशीर शेख, शोएब अल्ताफ शेख, दानिश काझी, शेरअली तांबोळी, अब्दुल्ला कुरेशी, अमान शेख, फारूख शेख, प्रसाद शिंदे, वैभव सांगळे, समीर पठाण, जावळे पवार, रवी गावडे आदीसह शिक्षक संस्थाचालक उपस्थित होते.

तसेच अल्पसंख्यांक व आदिवासी पदवीधर तरुणांसाठी एमपीएससी, यूपीएससी सेंटर अहमदनगरमध्ये सुरू करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा आणि  अल्पसंख्यांक संस्थानांना व मुस्लिम समाजाच्या बहुल भागात निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.

या सर्व गोष्टीला सकारात्मकता दाखवत आ.तांबे  म्हणाले की अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक संस्थांना निधी उपलब्ध करून देणार व अल्पसंख्यांक संस्थानांना व मुस्लिम समाजाच्या बहुल भागात आमदार इमरान प्रतापगडी यांच्या निधीतून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्‍वासन दिले.