ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेचे अहमदनगर शहरात स्वागत

भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेली कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेचे (भाग 2) नगरमध्ये आगमन झाले. प्रारंभी महापुरुषांना अभिवादन करुन रामकृष्ण कर्डिले यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले.
यावेळी रामकृष्ण कर्डिले, भास्करराव नरसाळे, योगी सुरजनाथ, अ‍ॅड. माया जमदाडे, मगन ससाणे, शिवाजी साळवे, घुगे महाराज शास्त्री, अ‍ॅड. महेश शिंदे, जालिंदर चौभे, रेव्ह. सतीश तोरणे, संजय कांबळे, गोरक्षनाथ वेताळ, शिवाजी भोसले, डॉ. भास्कर रणनवरे, प्रकाश लोंढे, गणपतराव मोरे, अमोल लोंढे, अतुल आखाडे, संजय संसारे, प्रा. रतीलाल क्षेत्रे, प्रा. सदा पगारे, भीमराव घोडके, डी.आर. राऊत, प्रभाकर सोनवणे, रावसाहेब साळवे, बबन साळवे, लता कांबळे, आशिष कांबळे आदींसह विविध सामाजिक संघटनेचे व भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेचे शहरात स्वागत करुन रॅली काढण्यात आली. माळीवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रॅलीचे प्रमुख चौकातून मार्गक्रमण झाले.

ईव्हीएम मशीन हटाव लोकशाही बचावच्या घोषणा देत कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रॅलीचा समारोप होऊन मेळव्याला प्रारंभ झाले. या मेळाव्यात भारत मुक्ती मोर्चा अहमदनगरच्या वतीने एक लाख रुपयांचा निधी जन आंदोलनासाठी देण्यात आला.