कालीचरण महाराजाची पुन्हा राहणार शहरात उपस्थिती
बुरुडगाव येथील श्री क्षेत्र ‘आशुतोष महादेव’ मंदिर येथे महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त अखंड त्रिदिनिय कीर्तन सोहळा व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आले.
शुक्रवार दि.१७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता कालीपुत्र कालिचरण महाराज व जगद्गुरु शंकराचार्य परमपूज्य श्री. विद्याशंकर भारती करवीर पिठादिश्वर व महंत शंकर भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत माळीवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते बुरुडगाव पर्यंत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या धर्मसभेत सहभागी होण्याचे आवाहन बुरुडगाव ग्रामस्थांनी केले आहे.