चांदबिबी महाल येथील शहापूर गावात आढळले दोन विषारी कोब्रा साप
अहमदनगर: शहापूर: मेट्रो न्यूज
चांदबिबी महाल येथील शहापूर येथे अशोक बेरड यांच्या घरात दोन विषारी कोब्रा साप आढळून आले.रात्रीचा घुशीचा शिकार करण्यासाठी घरात बसलेले हे दोन विषारी कोब्रा साप पाहून उपस्थितांच्या मनात धडकी भरली. गावातील नागरिकांनी सर्पमित्र कृष्णा बेरड पाटील यांच्याशी संपर्क साधला.आणि कृष्णा बेरड पाटील यांनी मोठ्या कौशल्याने सदर दोन विषारी कोब्रा साप पकडले . ते ५ ते ६ फुटी असल्याचे निदर्शनास आले. विषारी कोब्रा साप पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. कृष्णा बेरड पाटील यांनी वन अधिकारी सचिन शहाणे वनरक्षक अर्जुन खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी विषारी कोब्रा साप हे निसर्गात मुक्त केले.
यावेळी अंकित चव्हाण, आकाश पवार, ओम जंगम आदी उपस्थित होते. यावर्षी कोब्रा, अजगर, घोणस व मन्यार सर्प जातीमध्ये वाढ झाली आहे. व नागरिकांनी कोठेही सर्प आढळल्यास त्यांना मारू नये, त्यासाठी मो.नं. 9370075555 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन कृष्णा बेरड पाटील यांनी केले.