जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकलव्य संघटनेचे धरणे आंदोलन
पाचेगाव (ता.नेवासा) येथील भिल्ल समाजाचे अतिक्रमण कायमस्वरूपी करण्यात यावे ,तसेच काष्टी (ता.श्रीगोंदा) येथील वन हक्क दावे दाखल असून , त्यावर कारवाई करण्यात यावी , तसेच राहत्या जागेवर घरकुल व सर्व शासकीय योजना देण्यात यावी , या विविध मागण्यासंदर्भात एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे, जिल्हा सचिव सोमनाथ गोरे, युवा जिल्हाध्यक्ष किरण माळी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन गोलकर, विजय बर्डे, नानासाहेब बर्डे, वैजनता गोलकर, सुभाष माळी, किशोर माळी, सोमनाथ बर्डे, ज्ञानदेव बर्डे, देविदास बर्डे, सचिन बर्डे, कुसुंम बर्डे, सविता माळी, अलका माळी, भाऊसाहेब माळी, दुर्गा साळुंखे, चंद्रकला माळी, सुनील साळुंखे आदी उपस्थित होते.