डेंग्यूचे रुग्ण वाढले, आरोग्य यंत्रणा सतर्क
गेल्या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. यापुढे डेंग्यूची लागवड झालेल्या रुग्णांची माहिती संबंधित उपचार करणारे खासगी रुग्णालय आणि डेंग्यूचा अहवाल देणाऱ्या खाजगी प्रयोगशाळा यांनी जवळच्या शासकीय यंत्रणेला तात्काळ कळवावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात तसेच शहरातही डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातील दवाखान्यांमध्ये ही डेंग्यूचे रुग्णच अधिक आहेत. याशिवाय वातावरण बदलामुळे काही रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये ताप हे सर्वसाधारण लक्षण आढळून येत असल्यामुळे हिवताप, डेंगू, कावीळ चिकूनगुनिया किंवा पेशी कमी होणे या कारणांसाठी दवाखान्यात दाखल होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे.ऑगस्ट महिन्यात 23 डेंग्यूचे रुग्ण आढळते तसेच सध्याही शेकडो रुग्ण डेंग्यूचे आहेत. हे रुग्ण केवळ खाजगी दवाखान्यात असून ते शासकीय यंत्रणेला याबाबत काहीही माहिती कळत नाही. त्यामुळे डेंग्यूचे नेमके रुग्ण किती याबाबत नेमकी माहिती आरोग्य विभागाला समजेना झालेली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी उपाययोजनांच्या सूचना दिलेल्या आहेत.