मन की बात लाईव्ह ऐकताना नगरचे रेल्वे माल धक्क्यातील मजूर झळकले डी डी न्यूज वर
लोकल फॉर व्होकल आणि वेस्ट वेल्थ चा दिला देशाला उपक्रम
अहमदनगर ( प्रतिनिधी ) : नगरमधील रेल्वे माल धक्क्यावरील मजूर मन की बाद कार्यक्रम लाईव्ह बघत असताना थेट डी डी न्यूज या शासकीय वृत्तवाहिनीवर झळकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय झालेला आहे भारत नाही तर जगभरात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम एकत्र येऊन सार्वजनिक पणे भाजपा दाखवते नगरच्या रेल्वे माल धक्क्यावर आम्हाला समोर एलईडीद्वारे हा कार्यक्रम दाखवण्यात आला मोदींच्या मन की बात ने नगरचे हमालदेखील प्रभावीत झाले.
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविण्याच्या देशभरातील उपक्रमांची माहिती देताना वेस्ट वेल्थ आणि लोकल फॉर व्होकल चा उपक्रम त्यांनी देशाला दिला.
गुजराथ मधील पवित्र तीर्थ क्षेत्र अंबाजी मंदिराचा विशेष रूपाने उल्लेख करतांना येथील गब्बर पर्वताच्या कडे कपारीत ठेवण्यात आलेल्या धातू शिल्पा बाबत त्यांनी माहिती दिली. हे शिल्प विविध प्रकारच्या योग मुद्रा असून ही शिल्पे भंगारात फेकून दिलेल्या धातूच्या तुकड्यापासून बनविलेले आहेत. अशा प्रकारे वेस्ट वेल्थ मेनेजमेंट ची काही उदाहरने त्यानी दिली आणि टाकाऊ पासून टिकाऊ वस्तुवर देश वासियानी भर द्यावा यासाठी चे उपक्रम त्यानी सुचविले.
यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ऍड अभय आगरकर , माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे, जेष्ठ नेते वसंत लोढा, अजय चितळे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शिर्डी लोकसभा मतदार संघातील युवा नेतृत्व नितीन उदमले, सरचिटणीस तुषार पोटे , बंटी डापसे, मन कि बात चे जिल्हा संयोजक प्रशांत मुथा, बाळासाहेब भुजबळ, महिला नेत्या कालिंदी केसकर, सूर्यकांत खैरे, भाजपा युवा वोरीयर्स चे शहर जिल्हाध्यक्ष विशाल खैरे, दत्ता गाडळकर, भाजप कार्यालय प्रमुख किरण हासे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.
मोदी यांची मन की बात ऐकण्यासाठी रेल्वे माल धक्क्यावरील शेकडो मजूर आलेले होते. आपल्या मन की बात मध्ये मोदी यांनी विविध विषयांना स्पर्श केला. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार बल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. त्यानिमित्त रन फॉर युनिटी च्या माध्यमातून देशाच्या एकतेसाठी सर्वानी रस्त्यावर येऊन दौड मध्ये सभाभगी होण्याचे आवाहन तत्यांनी केले. देशाच्या पहिल्या महिला पंत्रधान इंदिरा गांधी यानाच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मोदी यांनी अभिवादन केले.
या दिवशी मेरा युवा भारत हा उपक्रम सरकार सुरु करीत असून देशभरातील युवकांनी मायभारत डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तामिळनाडू येथील शिवशंकरी येथील महिला कळणाकुमारी आणि ए के पेरुमल यांच्या मेक इन इंडिया थ्रू लिटरेचर या उपक्रमाचा उल्लेख त्यांनी केला.
15 नोव्हेंबर रोजी या दिवशी भगवान बिरसा मुंडा जयंती यांची जयंती असून हा दिवस जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले. देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समान आणि सम्मान पूर्वक जीवन मिळावे यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक व्यक्ती laa saman aani sammanpurvak जीवन मिळावे यासाठी त्यांचा प्रयत्न
नुकतेच पार पडलेले एशियन आणि पॅरा एशियन गेम्स मध्ये भारतीय खेळाडूनी ११२ पदके मिळवली. नंतर झालेल्या अपंगांसाठीच्या स्पेशल ऑलम्पिक वर्ल्ड मध्ये भारताने ७५ गोल्ड सह २०० पदकांची कमाई केल्याचा कौतुकास्पद उल्लेख त्यांनी आपल्या मन की बात मध्ये केला.
हा कार्यक्रम बघत असताना नगरचे रेल्वे माल धक्क्यावरील मजूर आणि नगरमधील भाजपचे पदाधिकारी मन की बात च्या थेट व्हिडीओ मध्ये दिसले. डी डी न्यूज ने खास दिल्ली हुन डी न्यूज संवाददाता योगेश शीतल आणि त्यांची टीम नगरच्या रेव्ले माल धक्क्यावर पाठवली होती. मन की बात संपल्यानंतर उपस्थित लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यात अभय आगरकर, भैय्या गंधे, दत्ता गाडळकर यांना प्रतिक्रिया देण्याची संधी मिळाली. नरेंद्र मोदी यांनी य मन की बात मध्ये मांडलेल्या लोकल फॉर वोकल या संकल्पनेची प्रशंसा त्यांनी केली.