नगरचे रस्ते झाले खड्डेमय 

रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते 

 

नगर शहरातील रस्ते हे एक दिव्यच झाले आहे. या रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे किंवा रस्त्यांची झालीय चाळण अशा वाक प्रचाराच्या पलीकडे गेली आहे .

 

नगर महानगर पालिकेत भाजपाची सत्ता आहे. पण भाजपाचे नगरसेवक पालिकेत अल्पमतात असल्याने पालिकेतले अधिकारी बहुतेक भाजप नगरसेवकांचे काही एक ऐकत नसावेत, कारण भाजपचे नगरसेवक ज्या भागात राहतात त्यांच्याच घरासमोरील रस्त्यावर खड्डे आहेत.  हे नगरसेवक इनोव्हा फॉर्च्युनर, रेंज रोव्हर सारख्या महागड्या गाड्या आहेत. अशा गाड्यांमधून ते प्रवास करीत असल्याने बहुदा नगरमधील खड्ड्यांचे दणके त्यांना बसत नाहीत. 

   

अलीकडे पालिकेने हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतल्याचे दाखवले. अक्खे ९० लाखाचे भरभक्कम बजेट त्यासाठी निगर्मित केले खरे पण हे खड्डे अजूनही बुजलेले नाहीत. उलट काही ठिकाणी खड्डे जेसीबीने २ फूट खाली खोदून त्यात खडी टाकून ठेवण्यात आली आहेत. प्रत्यक्ष खड्डे बुजविण्याचे नावाखाली मोठा मलिदा खाण्याचा विचार अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा दिसतो आहे. नगरकर रोज जीव मुठीत धरून या खड्ड्यातून वाटचाल करीत आहेत. 

 

   या खड्ड्यामुळे अपघात तर होतातच त्यासोबत अंगदुखी, सांधे दुखी, मणके दुखी, असे आजार नगरकरांना जडले आहेत . या खड्ड्यामुळे नगरच्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असल्याने नगरकरांना आता कोरोना काळात स्वशनाचे रोग देखील जडले आहेत. 

 

या नरक यातनांतून नगरकरांना मुक्ती मिळवायची असेल तर विरोधी नगरसेवकांना जागृत करावे लागेल. अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर आगामी काळात पालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात द्यायची की नको याबाबत देखील नगरकर आत्मपरीक्षण करीत आहेत.