गॅब्रिएला पुन्हा एनसीबी कार्यालयात दाखल

12 नोव्हेंबरला पुन्हा एकदा चौकशी   

मुंबई : 

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीची धडक कारवाई  जोरदारपणे सुरू आहे.  अभिनेता अर्जुन रामपालची  लिव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सला शुक्रवारी 12 नोव्हेंबरला पुन्हा एकदा चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. 
 
एनसीबीच्या समन्सनुसार गॅब्रिएला डेमेट्रियड्स चौकशीच्या दुसऱ्या फेरीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.  आज 12 नोव्हेंबरला पुन्हा एकदा तिला प्रश्नोत्तरे केली जाणार आहेत.  तर, शुक्रवारी अर्जुन रामपालची चौकशी होणार आहे. 
 
 बुधवारी 11 नोव्हेंबरला तब्बल 6 तासांच्या चौकशीनंतर गॅब्रिएला एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली होती.  यावेळी पुन्हा एकदा गॅब्रिएलाची चौकशी होण्याची शक्यता वर्वण्यात आली होती.  बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्यांची लिव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्स यांना एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावले होते.