नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्टच्या महाबली कुंभकर्ण निद्रानाश या पौराणिक देखाव्याचे उद्घाटन
नेता सुभाष मंडळाने देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक परंपरा जपली - प्रा. शशिकांत गाडे
नगर – गणेशोत्सवात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. सार्वजनिक मंडळांच्या वतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून देखावे सादर होत आहेत. या देखाव्यांच्या माध्यमातून परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचे काम होत असते. “नेता सुभाष मित्र मंडळांन नेहमीच वेगवेगळ्या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक परंपरा जपली आहे. यंदा सादर केलेला देखावाही असाच भव्य असून नागरिकांच्या मनोरंजनाबरोबरच धार्मिकता वाढीस लावण्यास मदत करणारा असा आहे. मंडळाचे मार्गदर्शक राहिलेले स्व. अनिलभैय्या राठोड यांनी मंडळाच्या माध्यमातून नगरमध्ये चांगले संघटन निर्माण केले. अनेक मंडळांचे त्यांनी मार्गदर्शक म्हणून आणि गणेश मंडळांना पाठबळ देण्याचे काम केले. प्रत्येक गणेशोत्सवात त्यांची आठवण नगरकरांना झाल्याशिवाय राहत नाही. नेता सुभाष मंडळाच्या माध्यमातून विक्रम राठोड यांनी त्यांचा वारसा समर्थपणे सांभाळला आहे. त्यांच्या कार्यास आमचे नेहमीच सहकार्य राहील.” असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले. नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्टच्या महाबली कुंभकर्ण या पौराणिक देखाव्याचे उद्घाटन श्रीमती शशिकला अनिल भैया राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, महापौर रोहिणी शेंडगे, मंडळाचे अध्यक्ष विक्रम राठोड, शहर प्रमुख संभाजी कदम, दिलीप सातपुते, राजेंद्र दळवी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर किरण काळे नितीन भुतारे, गिरीश जाधव, संजय शेंडगे, सचिन शिंदे, अरुणा गोयल, प्रा. अंबादास शिंदे, पारुनाथ ढोकळे, संतोष गेनप्पा, दिलदारसिंह बीर, पप्पू भाले, गौरव ढोणे, अरुण झेंडे, महेश शेळके, अशोक दहिफळे आदी उपस्थित होते
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विक्रम राठोड म्हणाले,
‘नेता सुभाष चौक मित्र मंडळ साठ वर्षे जुने असून नेहमीच गणेशोत्सवात ऐतिहासिक धार्मिक देखावे सादर करून आपला इतिहास आणि संस्कृती दृढ करण्याचा प्रयत्न करत असते यंदाच्या वर्षी ही महाबली कुंभकर्ण नेत्रांना अश पौराणिक देखावा आम्ही सादर केला आहे मंडळात रिद्धी सिद्धी आणि श्री गणेशाच्या मूर्ती मूर्तीची प्रतिष्ठापनाही केली आहे यावर्षी मंडळांनी भव्य कुंभकर्ण याबरोबरच 25 हलत्या मुर्त्या सादर केल्या असून निवेदन आणि लाईट इफेक्ट मुळे हा देखावा सर्वांचे आकर्षण ठरेल असेही सांगितले’ याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, संभाजी कदम, दिलीप सातपुते, किरण काळे, नितीन भुतारे, अभिषेक कळमकर आदींनी आपले मनोगत व्यक्त करून मंडळाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. शेवटी गिरीश जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.