सर्जेपुरा रामवाडी परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेत मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित युवक सामाजिक कार्यकर्ते साहेबान जहागीरदार व उद्योजक पै. अफजल शेख यांचा सदर घटनेची संबंध नसतानाही विनाकारण त्यांची नावे गुन्ह्यात अडकवण्यात आली होती . हि नावे वगळण्याची मागणी विविध संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली .
यावेळी आर्किटेक इंजि.अर्शद शेख, अमीर सय्यद, अँड.हाफिज सय्यद, अँड. डावर, जिया सय्यद, आरिफ पटेल, इम्तियाज शेख, इस्माईल शेख, इम्रान सय्यद, उमेर शेख, अहमद वस्ताद, इरफान जहागीरदार, अब्दुल गनी शेख आदीसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
विनाकारण खोट्या केसेस मध्ये अडकवणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. घटनेची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे , गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे , परंतु कोणीही निरपराधला शिक्षा होऊ नये , या संपूर्ण प्रकरणाची पूर्ण शहानिशा झाल्याशिवाय साहेबान जहागीरदार व पै.अफजल शेख यांना अटक करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.