भिंगारच्या युवकांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात (गवई) प्रवेश
अक्षय पाथरीया यांची भिंगार शहराध्यक्षपदी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात भिंगारच्या युवा कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी अक्षय पाथरीया यांची भिंगार शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व युवकांचे पक्षात स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, वाहतूक आघाडी अध्यक्ष संदीप वाघचौरे, संतोष पाडळे, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष नईम शेख, ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, युवक शहराध्यक्ष अमोल खरात, शहर कार्याध्यक्ष अजीम खान, शहर सचिव विनीत पाडळे, शहर उपाध्यक्ष जावेद सय्यद, जमीर शेख, मुन्ना भिंगारदिवे, अजय बोबडे, आकाश भालेराव, चिकू गायकवाड, आदेश पाडळे आदींसह भिंगारचे युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुशांत म्हस्के म्हणाले की, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी युवकांना एकजुटीने हुकुमशाही सरकार विरोधात उभे रहावे लागणार आहे. मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होत असून, धर्मा-धर्मात व समाजा-समाजात तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजली जात आहे. युवकांचा रोजगार, महागाई व महत्त्वांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी शहराच्या नामांतराचे मुद्दे उपस्थित करुन नागरिकांच्या भावनांशी खेळले जात आहे.
याप्रसंगी अक्षय गायकवाड (महाराज), सनथ भिंगारदिवे, बंटी गायकवाड, हर्षद वाघमारे, यश भिंगारदिवे, अभिषेक शेलार, रोहन धीवर, ओम क्षीरसागर, अनिकेत वारे, गणेश पंडित, संघराज भिंगारदिवे, सुयोग भिंगारदिवे, सागर अस्लम, हर्षद भिंगारदिवे, गौरव भिंगारदिवे, साहिल खरारे, अश्पाक पठाण, अस्लम पठाण, अशियान शेख, सोफिया शेख, अरमान शेख, आयान शेख, आदेश वाघमारे, अजिनाथ अलकुटे, शुभम गायकवाड, सचिन भिंगारदिवे, राहुल गायकवाड, सौरभ वैदण्डे, विशाल मुक्ता, सोनू पंडित, आदित्य ठाकुर, विराज लांडगे, आशिष शेलार, आदित्य गायकवाड, रोहन अरुण, रोहित लोखंडे, धनराज लोखंडे, राहुल अरुण, निखिल भालेराव, शुभम लोखंडे, सोनी चांदणे, मुज्जमील शेख, अल्ताफ शेख, साहिल शेख, अली शेख, फईम शेख, अब्दुलरहेमान शेख, शाहबाझ पठाण, शादाब सय्यद, आफताब शेख आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.