खासदार विखे यांच्या पाठीशी प्रत्येक केडगावकर उभा राहणार -सचिन (आबा) कोतकर

केडगावच्या मोहिनीनगर येथे सभामंडप कामाचा शुभारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावाच्या विकासाला चालना देणारे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी प्रत्येक केडगावकर उभा राहणार आहे. या उपनगरातील रखडलेले विकास काम मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून 54 ते 55 रस्ते व 11 सभा मंडप मंजूर करून दिले. इतर विकास कामे देखील भविष्यात त्यांच्या माध्यमातून मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांनी केले.
केडगावच्या मोहिनीनगर कायनेटिक कॉलनीतील गणपती मंदिराच्या सभामंडप कामाच्या शुभारंभाप्रसंगी कोतकर बोलत होते. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या निधीतून सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर यांच्या पाठपुराव्याने नुकतेच या सभामंडपाच्या कामाला प्रारंभ करण्यात आले. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, सुनील मामा कोतकर, बच्चन कोतकर, सुनील रामदास कोतकर, अजित कोतकर, भैरव कोतकर, सुमित लोंढे,बाबासाहेब वायकर, युवा मंच अध्यक्ष भूषण गुंड, बापू सातपुते, लताताई शेळके,सुनील उमाप, लक्ष्मण घोडके,अशोक कराळे, आप्पासाहेब कुलट, नंदू वाव्हळ, मोहन औटी, सचिन भोसले, राहुल डागा, देवीश घुले, गावडे महाराज, अशोक गदादे, सुभाष अहिरेकर, सिकंदर मेजर, रंजनी मुलवार, छाया कुलट, अनिल ठुबे, भरत ठुबे, शैलेश सुंबे, नवनाथ मासाळ, बाबासाहेब कोतकर, सोनू घेंबूड आदींसह परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जालिंदर कोतकर म्हणाले की, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केडगाव मधील विकास कामासाठी नेहमीच निधी देताना झुकते माप दिले. 20 कोटी पैकी 2 कोटी केडगावला देण्यात आले. कोणत्याही विकास कामाला नाही, म्हटले नाही. संदीप कोतकर महापौर असताना केडगावचा झपाट्याने विकास झाला. त्यानंतर विखे यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून अनेक कामे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.