मढीत कानिफनाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी….
गर्दीचा फायदा घेऊन चोरांची 'हात की सफाई '!!!
अहमदनगर : मेट्रो न्यूज : मढी
श्री. क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या दर्शनासाठी रंगपंचमीला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ढोल आणि ताश्यांच्या कडकडाटामध्ये कानिफनाथ महाराज की जय….असा जयघोष करीत काठीवाले आणि भाविक श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेत होते.
कानिफनाथांच्या जयजयकाराणे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता . रविवारी (तारीख 12) दिवसभरात मंदिराच्या कळसाला सुमारे 50 हजार काठ्या टेकवल्या गेल्याचा अंदाज आहे. प्रचंड गर्दीमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती . गेल्या दोन दिवसात मढीच्या यात्रेत सुमारे 100 कोटींची उलाढाल झाल्याचे समजते.
रंगपंचमी हा नाथांचा समाधी दिन. त्या निमित्त संपूर्ण गाभारा आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. महाराष्ट्रासह तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक , मध्य प्रदेश इथूनही नाथभक्त मढीत आले होते. गडावर जाण्यासाठी दोन प्रवेशदार द्वार आहेत. पैठण दरवाजा मार्गाने वाजत गाजत काट्या आणून मंदिराला प्रदक्षिणा घालून काठी कळसाला टेकवली की भाविकांची यात्रा संपन्न होती.
गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी ‘हात की सफाई ‘ दाखवली . पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, पोलीस कर्मचारी भगवान सानप व पथकातील कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरातून अनेकांना रंग हात पकडले . एका खिसेकापूने तर पोलिसांच्या हाताला हिसका देत गडावरून उडी मारून पळ काढला.