महाबळेश्वरच्या निसर्गाच्या कोंदणात वसलेलं जन्नी कुंभळजाई देवी
स्वयंभू जन्नी कुंभळजाई देवी मंदिर प्रांगणाचे सुशोभीकरण
महाबळेश्वरच्या निसर्गाच्या कोंदणात स्थानापन्न
स्वयंभू जन्नी कुंभळजाई देवी मंदिर
प्रतापगड वाई दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे
मुक्कामाचे ठिकाण मेटगुताड गावातले प्राचीन मंदिर
ग्रामपंचातीच्या पुढाकाराने होतेय प्रांगणाचे सुशोभीकरण
महाराष्ट्राचे चेरापुंजी असलेल्या सप्त नद्यांचे उगमस्थान असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर लागून असलेल्या मेटगुताड गावात प्राचीन अशा स्वयंभू जन्नी कुंभळजाई देवी मंदिर प्रांगणाचे सुशोभीकरण केलं जातंय.
महाबळेश्वर च्या अप्रतिम अशा निसर्गाच्या कोंदणात वसलेलं हे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा वाई ते प्रतापगड असा प्रवास करायाचे तेव्हा त्या दरम्यान जाताना किंवा येतांना या मेटगुताड गावात त्यांचा मुक्काम असायचा असा इतिहासात उल्लेख आहे. त्यावेळी महाराज जन्नी कुंभळजाई मातेच्या दर्शनासाठी येत असत. या मंदिराला प्राचीन आणि ऐतिहासिक असे महत्व असल्याकरणारे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या काना कोपऱ्यातून भाविक या मंदिरात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. अत्यंत जागृत असे हे देवस्थान आहे. मंदिरात कुंभळजाई माते बरोबरच वैष्णोदेवी, पद्मावती, मार्कंड देवी, जन्नी माता, कुंभळ देवी, अंबामाते सह नवदुर्गा आणि कालभैरवनाथाची देखील मूर्ती इथे विराजमान आहे.
मेटगुताड ग्रामपंचातीच्या पुढाकाराने आणि साताऱ्याचे आमदार मकरंद पाटील , खासदार श्रीनिवास पाटील, सभापती, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभळजाई मंदिराचा विकास केला जातोय.
निसर्गाच्या कुशीत इथे भव्य असं भक्तनिवास जलतरण तलाव इथे बांधण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतीने त्यासोबत मंदिराच्या प्रांगणात पेव्हिंग ब्लॉक टाकणे तसेच मंदिर परिसरात भव्य अशा रंगमंच उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.
या ठिकाणी ग्रामस्थांसाठी अवघ्या पाच हजार रुपयात मंगल सोहळे साजरे करण्यासाठी हे लोण परिसर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अत्यल्प दारात सुंदर अशा परिसरात लग्नाची व्यवस्था होणार असल्याने डेस्टिनेशन वेडिंग चा फील या ठिकाणी संपन्न होणाऱ्या सोहळ्याला येणार आहे.
नवरात्ररात इथे मोठा उत्सव असतो. गावदेवीची यात्रा देखील उत्साहात पार पडते ग्रामपंचायत आणि देवस्थान इथे मे महिन्यात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन करते. त्यावेळी मोठा भक्त समुदाय इथे उपस्थित असतो.
भाविकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेल्या सर्वानी आवर्जून जागृत स्वयंभू जन्नी कुंभळजाई मातेच्या दर्शनासाठी यावे असे आवाहन मेटगुताड ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.