वॉरीयर्स पुरस्काराने डॉ.गांडाळ सन्मानीत या प्रित्यर्थ नगरात हिवताप संघटनेच्या वतीने सत्कार

 नगर – राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण व प्रतिबंध कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जागतिक डेंग्यू दिनाचे औचित्य साधून  डॉ.पी.डी गांडाळ, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप व वैद्यकीय),नाशिक विभाग, नाशिक यांना नुकताच ‘डेंग्यू वॉरीयर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने अहमदनगर येथे डॉ.गांडाळ यांचा हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

     याप्रसंगी हिवताप संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.किसन भिंगारदिवे, सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप,श्री.अरुण लांडे, श्री.भागवत, श्री.संदीप भिंगार दिवे,श्री.सोनार, श्री.राम रासकर, श्री.वैराळ तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रवींद्र कानडे, नाशिक विभागीय कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ श्री.सहाणे, प्र.सहा.जि.हि.अधिकारी श्री.सावंत तसेच श्री.भामरे,श्री.गांगर्डे, सहाय्यक संचालक कार्यालय,नाशिक, जिल्ह्यातील तालुका आरोग्य पर्यवेक्षक तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

        राज्याचे पर्यटन व कौशल्य विकास मंत्री ना.मंगल प्रसाद लोढा, माजी आरोग्य महासंचालक तथा राज्य साथरोग सल्लागार डॉ.सुभाष साळुंके ( हू संघटनेचे सदस्य), अमेरिकन शास्त्रज्ञ श्री.स्कॉट टिकनर व श्री हेराल्ड ब्रेमॅन यांचे उपस्थितीत बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई येथील अमेरिकन दूतावासात इको-बायो ट्रॅप व लेर्पीीश्ररींश जनरल ऑफ अमेरिकन सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉ गांडाळ यांना डेंग्यू वॉरीयर्स म्हणून गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

     डॉ.गांडाळ यांनी नगर जिल्हा हिवताप कार्यालय येथे आरोग्य पर्यवेक्षक यांचे बैठकीत उपस्थित राहून हिवताप प्रतिरोध महिना व मान्सूनपूर्व पूर्वतयारी, उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले व त्या दरम्यान  डेंग्यू वॉरीयर्स पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना (र. न.2934/84) अहमदनगर  जिल्हा शाखेच्या वतीने डॉ. गांडाळ यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.