शरद पवार यांच्या पद त्यागच्या निर्णयाने राष्टवादीला हादरा…..

अहमदनगर:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्या अनपेक्षित घोषणेने सभागृहात जणू भूकंप झाला आणि लागलीच पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी उपस्थित नेते , पक्षाचे पदाधिकारी,  कार्यकर्ते यांनी आंदोलन सुरू केली . पवार यांना घेरावा घालण्यात आला .

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’  या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाले. यावेळी व्यासपीठावर पवारांसह त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, संपादक गिरीश कुबेर, राजू खांडेकर ,अभय कुलकर्णी ,खासदार सुप्रिया सुळे, उपस्थित होते सोबतच या सोहळ्याला प्रफुल्ल पटेल ,अजित पवार,छगन भूजबळ,दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, हसणं मुश्रीफ, फौजिया खान, यांच्यासह रशतवादीचे सर्व बडे नेते उपस्थित होते.

या पुस्तक प्रकाशन समारंभा नंतर पवारांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या साठ वर्षाच्या राजकीय ,सामाजिक जीवनातील कारकिर्दीचा आढावा घेताना विविध घटनांचा चढ- उतार ,यश अपयशांवर भाष्य केले.  आपल्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी आपण आजपासून पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची अनपेक्षित रित्या घोषणा केली . तसेच नवा अध्यक्ष नेमण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची समिती नेमत असल्याचे जाहीर केले , आपण राजकारणातून निवृत्त होत असलो तरी शिक्षण, क्रीडा ,शेती ,सहकार,  सांस्कृतिक या क्षेत्रात कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी आपल्याला हा निर्णय मान्य नसल्याचे सांगत पवारांसमोरच घोषणाबाजी सुरू केली . या गदारोळात पवारांनी आपले भाष्य आटोपले.

‘देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो’ या घोषणांनी सभागृह कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. आमदार अनिल पाटील तसेच पुण्यातील शहराध्यक्ष प्रशांत जगताप धाराशिव आणि बुलढाणा येथील जिल्हाध्यक्षांनी आपापल्या पदाचे राजीनामे देण्याची घोषणा केली. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली सर्व परिस्थिती लक्षात घेऊन अखेर सायंकाळी पाच वाजता शरद पवार यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दोन-तीन दिवसाचा अवधी द्या अशी विनंती नेत्यांना दिली.तसेच या दरम्यान कोणीही आंदोलन करू नये. राजीनामा सत्र तत्काल थांबवावा अश्या सूचनाही त्यांनी दिल्या. शरद पवारांच्या या निरोपानांतर कार्यकर्त्यांनी आपली आंदोलने मागे घेतली.