शहरात 5 मे रोजी मोफत होमिओपॅथिक उपचार शिबिराचे आयोजन

अहमदनगर:

काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनहोमिओपॅथिक हॉस्पिटलच्या वतीने काकासाहेब म्हस्के यांच्या जयंतीनिमित्त 5 मे 2023 रोजी शहरात मोफत होमिओपॅथिक उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विविध दीर्घ व्याधींवर मोफत उपचार केले जाणार असून, या शिबिरात स्त्री रोग तपासणी तसेच नेत्र रोग तपासणी देखील होणार आहे.

या शिबिराचे आयोजन सर्वसामान्य गरजू रुग्णांना जुनाट व्याधीतून मुक्तता मिळावी व होमिओपॅथिक उपचारांचा सर्वसामान्यांना फायदा होवून होमिओपॅथी औषधोपचारांचा प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी विश्‍वस्त डॉ. सुभाष म्हस्के यांनी दिली.

काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये कार्यकारी विश्‍वस्त डॉ. सुभाष म्हस्के, डॉ. सुमती म्हस्के, डॉ. अभितेज म्हस्के, डॉ. दीप्ती ठाकरे, व्यस्थापक समीर ठाकरे व होमिओपॅथिक कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निलिमा भोज यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अनेक जीर्ण व्याधींवर औषधोपचार करुन जे रुग्ण थकले आहेत, त्यांच्यासाठी होमिओपॅथीचा प्रभावी औषधोपचार केले जाणार आहे. बोल्हेगाव येथील काकासाहेब म्हस्के होमिओपॅथीक कॉलेज व हॉस्पिटल येथे सदर शिबिर होणार असून, यामध्ये दमा, संधिवात, जुनाट सर्दी, डोकेदुखी, स्त्रियांचे रोग, मासिक पाळी संबंधी विकार, मानसिक रुग्ण, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक दीर्घ व्याधींवर होमिओपॅथिकचे तज्ञ डॉ. नीलिमा भोज, डॉ. प्रिया परांडकर, डॉ. साईनाथ चिंता, डॉ. जिनेश बोरा, डॉ. प्रमोद लंके आदी तज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करणार आहेत.