संत निरंकारी मिशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
नगर – संत निरंकारी मिशनच्यावतीने ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ देशभरातील 400 हून अधिक शाखांमध्ये ‘वसुधैव कुटुंबकम’चा सिद्धांत समोर ठेवून स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला. मंडळाच्या नगर शाखेच्यावतीने मिस्कीन रोडवरील निरंकारी सत्संग भवनच्या प्रांगणात सकाळी 7 वा. योग विद्या धामचे श्री बारगळ सर व गणेश येनगंदुल यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 50 योग प्रेमींनी योगासने करीत योग दिवस साजरा केला. याप्रसंगी योगाचे महत्व व उपयुक्तता व्याख्यानांद्वारे उपस्थितांपुढे मांडण्यात आला.
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या निर्देशानुसार निरंकारी मिशनतर्फे आध्यात्मिकते बरोबरच वेळोवेळी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून, सद्गुरु माताजींच्या कथनानुसार आपल्या सर्वांमध्ये आध्यतिमक जागृती तेव्हाच शक्य आहे. जेव्हा आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वास्थ राहू, ज्या योगे आपला सर्वांगिण विकास होऊ शकतो.
संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने सन 2015 पासूनच योग दिवसचे विशाल स्वरुपात आयोजन करण्यात येत असून, या वर्षी सरकारच्या ‘वन वर्ल्ड वन हेल्थ’ सिद्धांतावर साजरा केला गेला. योग ही भारताच्या प्राचिन परंपरेतील एक अमुल्य देणगी आहे. ज्याचा जगातील अनेक देशांनी स्वीकार केला आहे. निरंतर योगाभ्यासाने तल्लख बुद्धी स्वस्थ हृदय, तणावमुक्त आनंदी व सहजसुंदर जीवन जगण्याची कला आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच सध्याच्या धावपळीच्या युगात योगाची मानवाला नितांत आवश्यकता आहे, म्हणूनच अशा प्रक़ारच्या स्थास्थवर्धक कार्यक्रमांचे महत्व वाढत आहे.