संत निवृत्तीनाथ पालखीचे सनी पॅलेस मित्र मंडळाच्यावतीने स्वागत
वारकरी हा खर्या अर्थाने विठ्ठलाचा अंश - बाबू चिपाडे
नगर – आषाढी आणि कार्तिकी या दोन मराठी महिन्याच्या एकादशीला महाराष्ट्राच्या आठही दिशांकडून भक्तांचा महापूर पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनास येत असतो. आषाढीला येणार्या हजारो दिंड्या व लाखो वारकरी शेकडो किलोमीटर चालत येतात. वारकरी हा खर्या अर्थाने विठ्ठलाचा अंश बनतो, नव्हे विठ्ठलच बनतो. त्याची सेवा म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाचीच सेवा होय, असे प्रतिपादन बाबू चिपाडे यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ पालखीचे नगर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील बारवेजवळ सनी पॅलेस मित्र मंडळाच्यावतीने स्वागत करुन पालखीची पूजा, आरती करण्यात आली. यावेळी दिंडीतील वारकर्यांना फराळ, केळी, चहाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पै.संदिप कर्डिले, बाबू चिपाडे, राजू बुधवंत, रोहित आवारे, देवाभाऊ काळे, योगीशेट देशमुख, अनिल कावळे, दादा चिपाडे, भाऊ तवले, विष्णू तवले, जितू गायकवाड, अजूभाई शेख, युसूफ पठाण, कैलास गर्जे, कैलास म्हस्के, सोमनाथ चिपाडे, नाना गिते, रमेश आंबेकर आदिसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबू चिपाडे म्हणाले, या वारीमुळे सर्वत्र भक्तीरंग उसळतो. श्री विठ्ठलाच्या प्रती असणारा भक्तीभाव प्रत्येक वारकर्याच्या चेहर्यावर दिसतो. या वारकर्यांच्या सेवेत आम्हाला प्रत्यक्ष पांडूरंग भेटला असे वाटते. श्री विठ्ठलाचे महात्म वर्णावे तेवढे थोडेच आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या 15 वर्षांपासून चिपाडे परिवाराकडून या पालखी सोहळ्याचे स्वागत करुन भक्तांना फराळाचे वाटप केले जाते. या उपक्रमाचे दिंडीकरी कौतुक करतात. अशीच सेवा या परिवाराकडून अखंडीत घडेल, असा विश्वास दिंडी चालकांनी यांनी व्यक्त केला.