सेंट सेव्हिअर्स हायस्कूल मध्ये ‘कांशीराम’ यांची जयंती साजरी

सेंट सेव्हिअर्स हायस्कूल मध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने पक्षाचे संस्थापक नेते कांशीराम यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना कांशीराम यांच्या संघर्षमय जीवन चरित्राची माहिती देण्यात आली.

बहुजन समाजाच्या हातात सत्ता देण्याचे काम कांशीराम यांनी केले. त्यांच्या विचाराने बहुजन समाज पार्टी दीन-दुबळ्यांच्या सेवेसाठी कार्य करत आहे.  यावेळी बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, मेजर राजू शिंदे, सलीम अत्तार, प्राचार्य ज्योत्स्ना शिंदे, ज्युनिअर कॉलेजचे प्रमुख अप्पासाहेब पंडित, गणेश क्षत्रिय, प्रशांत गायकवाड, अनिता वाजे, पूजा दुडगू, शिरीन इनामदार, अर्जुन चव्हाण, ठोंबरे सर,  रामचंद्र पवार, गणेश बागल, नंदलाल परदेशी, रामशंकर यादव, अजित यादव आदी उपस्थित होते.