हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिन साजरा

कार्यक्रमाने आनंद द्विगुणीत !!

अहमदनगर :  मेट्रो न्यूज  

भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे महिला दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिला सदस्यांचा  ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी महिलांचा सत्कार केला.

यावेळी रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, दीपक बडदे, सुरेश केदारे, विकास भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, नामदेवराव जावळे, अभिजीत सपकाळ, प्रवीण परदेशी, दिनेश शहापूरकर, दिलीप गुगळे, विठ्ठल राहिंज, विलास तोतरे, रामनाथ गर्जे, अशोक पराते, राजू कांबळे, किरण फुलारी, माजीद शेख, कुमार धतुरे, शैलेश बोधले, सिद्धू तात्या बेरड, राजू शेख, भाऊसाहेब गुंजाळ, विशाल भामरे, रवी यादव आदी उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, मागील २३ वर्षापासून अविरतपणे ग्रुपचे सामाजिक कार्य सुरू आहे. आरोग्याप्रति जागरूक राहून दररोज सकाळी ग्रुपचे सदस्य योग प्राणायाम करतात. तर वृक्षरोपण व संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे कार्य सुरु आहे. ग्रुपच्या या कार्यात महिला हातभार लावत आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सामाजिक चळवळीला महिलांच्या योगदानाने गती मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांनाचा  देखील  महिला दिन कार्यक्रमाने आनंद द्विगुणीत झाला असून, आनखी सामाजिक कार्य करण्यास बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त केली.