ॲड. मनिषा कडलग-डुबे पाटील यांची सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी निवड
अहमदनगर –
येथील ॲड. मनिषा कडलग-डुबे पाटील यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट- अ पदी निवड झाली आहे. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत ॲड. कडलग-डुबे पाटील यांनी महाराष्ट्रात चौथा तर महिला खुल्या प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
ॲड. मनिषा कडलग-डुबे पाटील यांनी न्यु लॉ कॉलेज अहमदनगर येथून आपले एल.एल.बी.चे शिक्षण घेत विद्यापीठात देखील गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकाविला होता. सन 2010 पासून अहमदनगर जिल्हा न्यायालयामार्फत पारनेर व बालन्याय मंडळाच्या कोर्ट नं 2 मध्ये विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांची निवड झाल्याबद्दल अहमदनगर शहरातून त्याचे विशेष कौतुक होत आहे. सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता ढगे मॅडम यांनी त्यांचे विशेष कौतुक करुन अभिनंदन केले आहे.